दरबार

जिकडे पहाव तिकडे बाबांचाच दरबार

त्यांच्या माग लोकांचा बाजार

जो तो उठतो अन होतो संत

जरासी जादू दाखवून होय म्हणतो महंत

भगव घालून, भस्म अंगाला चोळून

काही होत नसते संत

अन कोंबडे, बकरे कापून

मिळत नसते भगवंत

अडाणीच नव्हे तर सुशिक्षितांचाही यांच्या माग गराडा

हारतुरे उधळून काढती अकलेचा दिवाळा

काय कामाच ते शिक्षण समजत नाही भोंदू अन संत

जेव्हा दिसते अस, वाटते मोठी खंत