दारूची फॅशन

 

आजकाल दारूपिण झाल आहे फॅशन

जो तो जातो मोठ्या गर्वाने बार“, “पबमध्ये

आपल्या महागड्या गाड्या तेथे उभ्या करून

दाखवून रुबाब, अंगात आणून टशन

 

दारु पिण्यात अल्पवयीन मुलांचा फार मोठा वाटा

मोबाईल पाहता पाहता, हिडीसफिडीस गोष्टी करत

चिकन खाताखाता, पिती गटागटा

 

साहजिकच आहे, दारू आली की सोबतीला सिगारेट पाहिजेच

ते कमी की काय म्हणून मादकद्रव्यांची ही फर्माईश होऊ देच

एक बारहोत नाही तर दुसऱ्या पबकडे जावू दे

 

मायबाप ही पोरग तरुण झाल म्हणून दुर्लक्ष करती

त्याला त्याच बरेवाईट समजते म्हणून फुशारक्या मारिती

भरमसाठ पैसा देऊन आज ना उदया तो कमवेलचम्हणती

 

दारू, सिगारेट झाला आहे आजचा स्टेटस सिम्बॉल

बार“, “पबसमोर दिसतात तरुण नशेत

सांभाळत आपल्या शरीराचा तोल

बोलाविती मित्रांना चल करू मजाम्हणून

करून कॉल

 

तीर्थ, गोमूत्र, आशीर्वाद हे चांगले शब्द झाले आहेत कालबाहय

दारू, गटार, शिवीगाळ ह्या झालाय आजच्या काळातल्या गोष्टी सुसह्य