दारूची बाटली.....देवाचा चेहरा

 

आज सकाळी मी बाईकवर गिरड येथील दर्ग्यात जात असतांना

रस्त्यात मला एका गृहस्थाने हात देऊन थांबविले,

त्याच्या गाडीतले पेट्रोल संपले होते व तो मला पेट्रोलपंप पर्यंत लिफ्ट मागत होता

मी त्याला पेट्रोल पंप पर्यंत आणले, गाडीवरून उतरताच तो गृहस्थ मला म्हणाला

साहेब तुम्ही इकडे कुठे चाललातमी त्याला मोठ्या आनंदाने सांगितले

मी बाबा फरीदयांच्या दर्ग्यात चाललो दर्शनाला

ते ऐकताच तो गृहस्थ मला म्हणाला तुम्ही मुसलमान आहात

मी त्याला हासून म्हणालो नाही मी हिंदू आहे

तोच तो गृहस्थ तोंड वेंगाळून मला म्हणाला 

काय ठेवल आहे हो त्या दर्ग्यातआपलेच लोक जास्त जातात तेथे

ते ऐकून मी विचारात पडलो व पटकन त्याला म्हणालो 

हे आपापले विचार आहेतकुणासाठी ती जागा जातीधर्मात विभागली असेल,

कुणासाठी बाबा फरीदहिंदू किंवा मुस्लिम असेल, पण माझ्यासाठी तो देव आहे

असे म्हणून मी दर्ग्याकडे दर्शनासाठी रवाना झालो

 

मित्र हो, कुणी काहीही म्हणो आपला चांगुलपणा सोडू नये

बीअर बार मध्ये जाण्यापेक्षा मंदिरमस्जिदीत जाणे केव्हाही चांगले

दारूची बाटली पाहण्यापेक्षा देवाचा चेहरा पाहणे केव्हाही चांगले,

प्राणिहत्या करून मटणमच्छी खाण्यापेक्षा देवाचा प्रसाद खाणे केव्हाही चांगले

म्हणूनच म्हणतो माणूस बना, हिणवू नका कोणा