दारूची बाटली

दारूची बाटली

दुःख, दर्द, गरिबीची पोटली

पेल्यावर पेला

दाखविते नरकाचा नाला

औटघटकेची नशा

फिरविते सावकाराच्या घराच्या दिशा

जाते एक एक चिज

हळू हळू घराची होत जाते झिज

बाटलीचे भोग

शरिरात बळावतात रोग

होतो पैशाला पासरी

ना गाठी काही, येते लाचारी

एवढ सर्व करून शेवटी

सोबत नेते बिचारी