दारू पिऊ नका

 

कोणी पाजते म्हणून दारू पिऊ नका

फुकटची भेटते म्हणून मटण पार्टी झोडू नका

उद्या तुम्हाला ही त्याची परतफेड करावी लागेल,

त्यांना ही दारू, मटण खावू घालावे लागेल

हे विसरू नका

 

दारू पिल्याने होते बर्बाद

पैशाला पासरी होऊन कुणापुढे हात पसरू नका

ज्यांच्या मैफिलीत तुम्ही दारू पिता,

ज्यांना आपला जिवलग मित्र म्हणता

तो ही फक्त तुमच्याकडून दारू पियेपर्यंत साथ देईल

कराल त्याच्याकडून कुठल्या मदतीची अपेक्षा

तो ही दारातून तुम्हाला हाकलून देईल, हे विसरू नका

 

बिना मतलबाने ना कुणी पाजत, ना कुणी मच्छी चारत

तुम्हाला देशोधडीला लावणाऱ्यांना थारा देऊ नका

कोणी दारू पाजलीतर त्याचे एहसान म्हणून

कुणाचे अवैध, बेकायदेशीर कामे करू नका

जर दारू पिऊनकुणाचे नियमबाहय कामे केली नाही

तर कुणाच्या दबावात येऊन फसू नका

 

आपल कुटुंब सोन्यासारख, त्याची कदर करा

दारूच्या नशेत त्यांचे हाल करून, त्यांच्यावर रुसू नका