दारू सोडा

शरीराचा झाला सापळा,

लिव्हर झाले निकामी

अन्नपाणी लागेना,

तरी दारू पिल्या बिगर काही भागेना


घरात अठराविश्व दारिद्र्य

अंगाला कधी चांगले वस्त्र नाही

मुलमुली लग्नाच्या झाल्या त्याची काळजी नाही

अन दारू पिण्यासाठी बिनबोभाट दारूच्या गुत्त्यावर जाई


शरीर झाल अस्थिपंजर,

रोगांचा त्यात वावर,

लोकांच कर्ज अंगावर

तरी दारूत बुडविल्याशिवाय धकेना भाकर


बघा इतकी घाणेरडी आहे दारू

नका तिच्या नादी लागू

पाहून दहा लोकांचे हाल

थोड तरी सुधरू