काय देवाच्या नावान दिंड्या काढता,
अखंड ज्योत लावता
अरे त्यापरीस
पाणी वाचविण्याकरिता
पाणीदिंडी काढा,
लोकांना जागृत करण्यासाठी
ज्ञानदिंडी काढा
अन अज्ञान, अंधःकार मिटविण्यासाठी
जनोपयोगी कामे करून
विकासाची अखंड ज्योत लावा
तेव्हाच या देशात
मंदिरासारखी स्वच्छता
व प्रसन्न वातावरण राहील,
प्रगतीची वात तेवत राहील
अन गुण्यागोविंदान इथला माणूस राहून
देवपदाला प्राप्त होईल