दीक्षाभूमीत, महात्मा फुलेंच्या वाड्यात जा

 

मला दीक्षाभूमीत, महात्मा फुलेंच्या वाड्यात,

राजर्षी शाहू महाराजांच्या राजवाड्यात जाऊन

या महान देवतातुल्य विभूतींच्या अस्थींचे,

त्यांच्या पदचिन्हांचे दर्शन घेऊ दया,

मला त्यांच्या सारखीच पुरोगामी विचारांची बुद्धी येऊ दया

अन अन्यायाविरुद्ध लढून समाजकार्य हातून घडू दया

 

जेव्हा जातो दीक्षाभूमीत, महात्मा फुलेंच्या वाड्यात,

राजर्षी शाहू महाराजांच्या राजवाड्यात अभिमानाने भरून येतो माथा

झरझर चित्रपटासम आठवते त्यांच्या संघर्षाची गाथा

सदैव यांची स्मृती चित्ती उरू दे

यांच्या विचारावरच हा भवसागर तरु दे

 

यांनी लिहिलेली ग्रंथ संपदा हीच खरी पथदर्शिका

जागोजागी यांचे वाचन, कीर्तन, प्रवचन, सप्ताह, पूजन होऊन

सगळ्यांचे आत्मप्रबोधन होऊ दे