देखावेच सगळे लग्न सोहळे

 

माथी सिंदूर, कंठी सौभाग्याचे लेणे

विवाहाच्या नावाखाली लादली बंधने

 

टाकून घुंगट डोक्यावर

बंद केली जगाची कवाडे

 

सासू देवो किती ही त्रास अथवा दूषणे

तिने मात्र गाली गोड हसणे

 

घरची सगळी कामे करावी एकटीने

तिच्या पदरी नवऱ्याच्या ताटातील उष्टे खाणे

 

देखावेच सगळे लग्न सोहळे

स्त्री मात्र त्यात सदैव होरपळे