देखाव्याचे राष्ट्रीय सण...

 

सणवार, देव/पिरांच्या जयंत्या, उत्सव केवळ देखावा झाला आहे

त्यातल पावित्र्य संपून जो तो झगमगाटात रममाण झाला आहे

देव/पिरांच्या जयंत्यांना त्या देवाला, पीराला मान्य असलेल्या

विविध रंगांच्या टोप्या करून मस्तकी धारण

त्या त्या देवाचे/पीराचे नाव, चित्रे वा कलमा लिहिलेले

गमछे/पोशाख फिरतो घालून,

देव, सणवार, उर्स आम्हाला किती प्राणप्रिय हे दर्शवितो

वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ख्रिसमस ट्री, उजळलेल्या पणत्या किंवा

ईद मुबारकचे डिजिटल होर्डिंग्ज ठिकठिकाणी झळकवून

मंदिर, मस्जिद, गिरिजाघरात जाण्यायेण्याची धावपळ करून

दिवसभर किती बिझी आहे हे भासवितो

प्रत्येकाशी त्या दिवशी आपुलकीने बोलतो,

भांडण झाल तरी नमत घेऊन समेट घडवितो

त्याच दिवशी दिवसभर त्या त्या देवाचे/पीराचे नामस्मरण तोंडान चाले

अन मोबाईलवर त्यांचे वेगवेगळ्या वाद्यावरची गाणी ऐकायला मिळे

तो उत्सवाचा दिवस सरताच, दुसऱ्या दिवशी पासून, एकमेकांची अवकात कळे

 

राष्ट्रीय सणांचे ही तेच हाल, राष्ट्रीय सणांना दिवसभर रस्त्याने

जोरजोराचा आवाज करीत तरुणतरुणी देशभक्तीपर गाणे डी.जे.’ वर लावून,

हातात मोठमोठे झेंडे घेऊन ते हिडिसफिडीसपणे हालवत हैदोस करीत फिरे

शुभ्र वस्त्रे अंगावर अन त्या दिवशी जो तो महान देशभक्त्त बनलेला असे

अन तो दिवस सरताच ठिकठिकाणी राष्ट्रीय झेंडे जमिनीवर पडलेले दिसे

पण त्यावरून कोणी जाता होईल झेंड्याचा अपमान म्हणून

ते आदराने उचलण्यास कोणाचे हात न धजे

 

हीच स्थिती सगळीकडे आहे

राजकारणात ही आपल्या पक्षांच्या वार्षिक उत्सवाला प्रत्येक राजकीय कार्यकर्ता

शुचिर्भूत होऊन राजकीय पोशाखात दिसे, मिठाई काय वाटे,

लोककल्याणकारी भाषणे वाचे अन तो दिवस सरताच

दुसऱ्या दिवशी पॅन्ट अन टी शर्टवरफिरतांना दिसे

 

चंगळवादी संस्कृतीचे अवलोकन करू लागलो आहे आपण

T.V. वर सिरीयल मध्ये जसे अभिनेते

सणावारांना, राष्ट्रीय सणांना वागतांना दिसतात

आपण ही तसेच त्यांचे अनुकरण करून, स्वतःला तसे समजून

त्या दिवसापुरता चांगुलल्याचा अभिनय करतो

सणवार, जयंत्या, उत्सव धुमधडाक्यात मनवून

त्या दिवसापूरतच त्यांना मर्यादित ठेवतो