आम्ही मानव इतके देवताळलो आहे की
जे काहीही आमच्या सोबत घडते
अस समजतो की ते देवच करते
लेकर होत नाही तर देवाला नवस बोलते
अन लेकर होताच त्या लेकराच्या कानात
सोन्याचा नागोबा छिद्र करून टांगते,
अंगावर देवाच्या नावान Tattu करून गोंदते
अन दरवर्षी त्या देवाच्या पुण्यतिथीला
तीर्थक्षेत्री जाऊन अंगात येऊन घुमते
बर एवढच नाही मनोकामना पूर्ण होताच
शंभर किलोमीटरची बिना चपला पैदल पदयात्रा करते,
डोक्यावर तुळशीवृंदावन धरते,
रस्त्याने लोटांगण घालत चालते,
अंगात चाकू, छुऱ्या, भाले, तलवारी खुपसून
शरीर रक्तबंबाळ करते
हे कमी की काय म्हणून
स्वतःची जीभ छाटून, अर्पण करून,
देवाचे आभार मानते
मोठा बिनडोक माणूस आहे,
लेकर पैदा तो करतो अन त्याचे श्रेय देवाला देतो
सर्वांगसुंदर शरीराला देवाच्या नावावर
गरम लोखंडाच्या डागण्या देऊन
स्वतःवर कुरूप म्हणविण्याचा शाप ओढवून घेतो