देवरूपी मित्रांचा बनवा कारवाँ

 

मी तर म्हणतो नातेवाईक अन दोस्तांशी संमंध ठेवल्यापेक्षा

देवाशी मैत्री करा, दररोज काही वेळ मंदिरमस्जिदीत बसून,

तिथ रडून देवाला आपले गाऱ्हाणे सांगा

दोन क्षण शांत बसून स्वतःस तिथ विसरा

 

त्याला कुणाचा बाट नाही अन श्रीमंतीचा थाट नाही

तो नातेवाईकासारखा खट नाही, तुमच गुपित ऐकून धोका देत नाही

बिचारा शांततेत सर्व ऐकतो

थोडी कळ सोस, हे ही दुःखाचे दिवस जातीलम्हणून हिम्मत देतो

बर, तुम्ही वर्षभर त्याच्याकडे गेले नाही तर त्याला त्याचा राग ही नाही

अन संकट आल्यावर धर्मालयाची पायरी चढल्यावर

दुसरीकडे तोंड करून घुस्स्याने तो तुमच्याकडे पाहत ही नाही

 

कोणत्या दोस्ताला पारट्या अन पैसे उधार देऊन फसू नका

त्यापेक्षा धर्मालयात पाणपोई उभारा, भिकारी अन अपंगांना खाऊ घालून

अन्नदान करून दीनदुबळ्यांच्या चेहेऱ्यावर हसू आणा

किती ही गोड बोला, दोस्त अन नातेवाईक

काही भरवसा नाही कधी करेल आपले सर कलम

त्यांनी दिलेल्या वेदनेवर फक्त भगवंतच लावतो मलम

 

म्हणून म्हणतो मैत्री करा तर देवाशी करा,

गर्वाने सांगा मी अमुक देवाचा भक्त आहे म्हणून

त्याला डोक्यावर मिरवा

पायलीचे पन्नास दोस्त अन खंडीभर नातेवाईक गोळा करून

त्यांच्या मानपानावर खर्च केल्यापेक्षा

संतसंगती धरून मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये असलेल्या

देवरूपी मित्रांचा बनवा कारवाँ