देवाचा आदेश "सर आंखो पर"

 

मंदिरमस्जिद, चर्चमधून देवाचा आदेश आला

गर्दी असता तेथे नको जाऊ

फुले, हार, नारळ नको वाहू

कुणा बाईमाणसाकडे वाईट नजरेने नको पाहू

नसेल होत दर्शन तर तसेच दे राहू

उगीचच कुणाला धक्के मारत देवापुढे नको जाऊ

अनिच्छेने देवाची स्तुती नको गाऊ

तुझी श्रीमंती घरीच दे राहू

खिशात पैशाच पाकीट ठेवून

उगीच तुझा तोरा देवाला नको दावू

कोणत्याच जातीधर्माबद्दल मनात राग नको ठेवू

अन देत असशील राम, रहीम, येशूला शिव्या

तर पुन्हा माझ्याकडे नको येऊ

 

देवाचा आदेश सर आंखो पर

त्यान जे सांगितल त्याच पालन करेल मी जीवनभर