देवाची करण्या प्रतिष्ठापना नका पाहू मुहूर्त

 

हे बुद्धिदाता गणनायका, सदबुद्धी दे अभिभावका

करण्या तुझी प्राणप्रतिष्ठा पाहती पंचाग

दूर सारण्या राहू, केतू अन भद्र कालका

 

 

अरे तूच तर तिमिर दूर सारीशी,

दुःख, विघ्ने हारीशी,

घरात तुझ्या आगमनेच विघ्ने पळीशी

तर हे पंचांग, शुभ वेळ पाहण्याचे स्तोम कशाशी

 

 

सर्व विघ्ने हरावी, दुरित जळावी म्हणून असे घरोघरी तुझी स्थापना

पण अज्ञानी जन, मद्य पिऊन तुज वाजतगाजत आणती,

तुझ्यापुढे चोली के पीछे….”, “वाजले की बारा….”

गाणे वाजवीत हिडीसफिडीस नाचती

विनंती तुज शुप्रकर्णा

देऊन तयांना सुबुद्धी, अस न करण्यापासून सुचविशी

 

 

लंबोदरा, हे हेरंबा

केवळ तुझ्या दर्शनेच गलितगात्र दूर होती

कसे रे हे निर्बुद्ध संकुचित जनांचे मन

कोणत्या ही देवाची करण्या प्रतिष्ठापना मुहूर्त पाहती

संकटात असता आपण केव्हाही देवास हात जोडतो

तेव्हा न मुहूर्त शोधतो, कधी संकट दूर होईल हेच पाहतो

 

 

तर का मग विघ्नहर्त्याची करण्या प्रतिष्ठापना पंचांगावर विसंबतो

देवाचे पाऊल आपल्या घरात लागता तोचि दिवाळी अन दसरा

असे असतांना ही, देवाची प्रतिष्ठापना करण्यास मुहूर्त शोधता

अरे, तुमच्या सारखा मूर्ख नाही कोणी दुसरा

देव घरात येताच पळतो अंधार, उजळतो आसमंत सारा, हे का विसरता

 

 

तोच तर कर्ता करविता आहे, त्याला कसला आला राहू, केतू अन भद्रा

केवळ उत्सवातच नव्हे, जेव्हा इच्छा होईल तेव्हा

केव्हाही अभिमानाने परमेश्वराला आपल्या घरात विराजमान करा

अपशकुन, अशुभ वेळ हया गोष्टी कमीत कमी देवासाठी तरी विसरा