देवाची सेटिंग

 

अस ऐकल आहे अन पुराणात लिहील आहे की

शरीर मरते पण आत्मा मरत नाही,

माणूस मरताच आत्मा निघून जातो व नवीन शरीर धारण करतो

मला वाटते देवाजवळ ही सेटिंग असावी चांगल्या वाईट आत्म्यांची

V.V.I.P. आत्मे वेगळे, A-Listed आत्मे वेगळे अन उरलेले खेरखार सगळे

 

जो जातक देवाला लावत असेल चांगला भोग,

ठेवत असेल त्याला महालात, देत असेल मखमलीचे कपडे अन

सोन्याचांदीत मढवून घालत असेल त्याच्या गळ्यात आभूषणे

अशा मोठमोठ्या उद्योगपती, Star of Millennium च्या घरी

हे V.V.I.P. Listed आत्मे पाठवून त्यांना देत असावा नवा जन्म

अन पिढ्यानपिढ्या वैभवात लोळू देत असावा आजन्म

 

A-Listed आत्म्यांना प्रथितयश उच्चमध्यमवर्गीयांच्याच घरी देत असावा जन्म

अन घोटाळे करून क्षणात नवश्रीमंत होणाऱ्यांच्या पोटी घेत असावा पुनर्जन्म

राहिलेले खेरखार आत्मे जे जन्मभर गरिबीत लोळले, हालपेष्ठा सहन केल्या,

कर्जात मेले, गुन्हेगारीत रमले अशा महारथ्यांना मारत असेल सर्वसामान्यांच्या माथी

 

अरे जे आत्मे सदैव गरिबीत लोळले, गुन्हेगारीत रमले, कर्जात मेले

ते कशाला कुणाबद्द्ल असूया ठेवतील

अशा खेरखार आत्म्यांना ही माहित असते आपण काही पुण्यवान नाही

जन्म घेऊ तर दुःखितांच्या, शोषितांच्याच पोटी

मग ते ही आत्मे नवीन शरीर धारण करताच, हीन भावनेने,

हा ही जातक आधीच्या शरीरासारखा दळभद्रीम्हणून,

त्याच्याबद्द्ल तिरस्कार बाळगून, त्याला छळून, कर्जबाजारी करून

रेल्वेरुळावर जीव सोडण्यास भाग पाडतात

अन जे काही बोटावर मोजण्यासारखे संत नामदेव, ज्ञानेश्वर माउली,

संत तुकारामासारखे पुण्यात्मे असतात

त्यांना देव स्वतःच पुष्पक विमान पाठवून, आपल्याकडे बोलावून,

यांच्यापासून आपल्या सिंहासनाला काही धोका नाहीम्हणून

स्वतःची स्तुती आळविण्यासाठी

आपल्या दरबारात नवरत्न म्हणून बसवून ठेवतात

 

देवा तू ही मोठा झोलझाल करनेवाला आहे

सगळ चांगल आपल्याकडे ठेवतो अन

वाईट सामान्य माणसाच्या माथी मारतो