देवाच्या नावावर थांबवा पशुहत्या

 

मित्र हो, तुम्ही कधी विचार केला का की

देवळातल्या देवाला सकाळी सकाळी पंडित सोवळ्यात अभ्यंगस्नान घालून,

पंचामृतात न्हाऊन घालून भरजरी कपडे घालतो,

लोकांचा बाट होऊ नये म्हणून, त्यांना दूर उभे राहण्यास सांगून

पूजा, आरती करतो

आरती होताच शुध्द शाकाहारी अन्नाचा नैवेद्य दाखवितो

 

दर्ग्यात अन चर्चमध्ये ही तेथील खादिम अन पाद्री शुचिर्भूत होऊन

तिथली मजार वा चॅपल स्वच्छ करून

तिथे कुणीही अभद्र व्यवहार करू नये हे पाहतो

अशा शुभ वातावरणात तो देव सगळ्यांकडे कारुण्यपूर्ण नजरेने

कुठलाही भेद न करता पाहतो

 

काहो असा सोवळ्याओवळ्यात राहणारा देव,

शाकाहारी अन्न भक्षण करणारा देव

कधी मांसाहाराला शिवणार का ?

कुणा प्राणिमात्राची त्याच्या नावावर होणारी हत्या सहन तरी करणार का ?

 

स्वतःवर थोडस संकट आल की संकटाला घाबरून ते निवळण्यासाठी

कोंबडबकर कापण्याचा नवस बोलता

खरच त्याला आपण देव म्हणतो तो कुणाचा बळी घेऊन

तुम्हाला सुख देणार आहे का ?

 

जो देव भक्ताला दुःखी पाहू शकत नाही

खरच तो नवसाच्या नावावर कुण्या जनावराला

रक्ताच्या थारोळ्यात तडपतांना पाहणार आहे का ?

 

मग का त्याच्या नावावर कोंबडेबकरे कापता

असे केल्याने देव बाटणार नाही का,

तो तुमच्यावर कोपणार नाही का ?

 

मित्र हो, जो सगळ्यांच चांगल चिंतीतो

मग तो देव असो कि मानव अशा रानटीकृत्यांमुळे

नक्कीच तुमच्यावर रागावणार व तुमच कधीच चांगल नाही करणार

 

म्हणून विनंती करतो, नका देवाला बदनाम करू

त्याच्या नावावर कोंबडेबकरे कापून

त्याच्या मांसावर यथेच्छ ताव मारू

 

मित्र हो थोडा विचार करा

देवाच्या नावावर नका मारू कोणत्याही जनावरा