देवापुढे बसलेली उदास मंडळी

 

जेव्हा जावे मंदिर, मस्जिद, गिरिजाघरी वा अन्य धर्मस्थळी

दिसे तेथे देवापुढे बसलेली उदास, चेहरा पडलेली,

काळजीने काळवंडलेली मंडळी

 

समोर असे परवरदिगार डोळे मिटून ध्यानस्त

प्रसाद, फुले अन दिवे जवळी जळत असती

आकर्षण्या त्याचे ध्यान भक्तही विविध क्लूपत्या खेळती

कोणी घंटी वाजवून त्याचे ध्यान भंग करती तर कोणी

टाळ्यांच्या गडगडाटात कोरसमध्ये म्हणती आरती

एवढे कमी काय म्हणून, त्याच्या कानातही कुजबुजून

आपले गाऱ्हाणे सांगती

 

धर्मस्थळाच्या आजूबाजूला हारफुलांचे दुकाने सजती

भाविकास जोरजोराने आवाज देऊन, तेथील दुकानदार

आमच्याच दुकानातून पूजा साहित्य घेऊन जा म्हणती

तू नेहमीच माझे गिऱ्हाईक आपल्याकडे ओढतो

म्हणून एकमेकांशी भांडत सुटती

 

भगवंत जरी डोळे मिटून ते पाहती, परी सगळ्यांचे दुःख ते जाणती

आले आता तुमच्यावर दुःखाचे दिवस म्हणून का रडसी

जेव्हा होती चांगली वेळ तेव्हा कसे होते हवेत उडती

मनात जणू ते असेच म्हणत असती

नका दुखवू कुणाचा आत्मा, सत्कर्म करा म्हणून ते सांगती

वारंवार धर्मस्थळी बोलावून तुमच्या हातून प्राणिमात्रांची सेवा करून घेती

करून संकटाचे निवारण, “भगवान के घर देर है, अंधेर नहीवदती

 

रामदास स्वामींची वाणी मनास मोठी मोहे

जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे