मी आता देवाला हात जोडत नाही
वा दर्ग्यात माथा रगडायला जात नाही
पुष्कळ केल हे, पण काहीच फायदा झाला नाही
संकटावर संकटे येतच गेली
पण देव काही मदतीला आला नाही
खूप आशाळभूतपणे पाहत होतो त्यावेळी त्याच्याकडे
पण त्याला मायेचा पाझर फुटलाच नाही
संकटे आली, त्यात भरडलो गेलो, नुकसान झाल
अन ते नुकसान कस भरून निघेल
याच विचारात जिंदगी काढत गेलो
मग कळल; एवढ देवाला, पीराला पुजल,
त्याला हात जोडले, डोक रगडल
पण देवान ही संकट नाही निवारल
त्यावेळी मलाच लोकांपुढे मदतीकरिता हात जोडावे लागले,
विनवण्या कराव्या लागल्या,
त्यांच्यापुढे गयावया करून माझ्या संकटातून मार्ग काढावा लागला
तेव्हा पासून देव पुजन सोडल अन दुनियादारी शिकलो
आपल काम कोणाकडून करून घ्यायच आहे
तर कस कोणाशी वागायच,
गोड गोड बोलून आपल काम काढायच
प्रसंगी त्यांच्यापुढे झुकायच हे मी शिकलो
अन अस करून ओळखीन तर कधी कुणाच्या मदतीन
आपल काम काढून घेऊन दुःखाला दूर लोटल
मित्र हो, दुःखात देव नाही येत धावून,
स्वतःलाच, दहा लोकांना हात जोडून, संकटे निवारावी लागतात
म्हणून प्रत्येकाशी चांगले वागा,
देवाला पुजण्यापेक्षा माणुसकीला पूजा
व्रतवैकल्ये शिकण्यापेक्षा दुनियादारी शिका अन जग जिंका