देवा असा का करतो

 

देवा असा का करतो

लबाडाचं पोट भरतो

अन इमानदाराला उपाशी मारतो

 

देवा असा का करतो

कुणी सुखसमृद्धीत लोळतो

अन कोणी दारिद्रयात मरतो

 

देवा असा का करतो

कुणास आयत मिळत

अन कुणास कष्ट देऊन छळत

 

देवा असा का करतो …….