आपण किती मानवतावादी आहोत ते बघा
साधूंच, फकिरांच सोंग घेणाऱ्यांना देवदूत समजून
त्यांना आपल्या घरी आणून
त्यांची मनोभावे देवासारखी पूजा करतो,
त्यांना मानाने आग्रह करून गरमागरम
दूध–तुपाच पंचपक्वान्न खाऊ घालतो
वरून काही दक्षिणा त्यांच्या हातात ठेवतो
पण दारात कोणी याचक आला असता
त्याला दोन शिव्या देऊन हाकलून लावतो
ज्या साधूच, फकीराच सोंग घेतल आहे त्या षंढपुरुषाला
किंवा टक्कल करून, भुवया कोरून, मोठ गंध लावून
दहा लोकांसमोर झोपणाऱ्या साध्वी/संन्यासिनी
खरच तो/ती सत्शील आहे का ते बघत नाही
तो साधू किंवा ती साध्वी स्वतःच्या आश्रमात
काय अश्लील चाळे करतो/करते ते पाहत नाही
अन अशा या अमंगळांच्या फोटोला हात जोडल्या शिवाय
आपण घराबाहेर बाहेर निघत नाही
खरा गरजवंत, भुकेला जरी दिसला
तरी तो नाटक करतो म्हणून आपण त्याला हिणवतो
त्याच्या अंगावरचे कुणी दिलेले कपडे पाहून
कुठून तरी चोरले असावे असे म्हणतो
एवढ मात्र नक्की, रंजल्यागांजल्यांची जो बाळगतो खंत
तोची खरा देव अन संत हे मात्र आपण विसरतो