देव आहे कुठे

 

धुंडाळली सारी मंदिरे

पालथी घातले सारे देव्हारे

लावले अंगारे, धुपारे

जाळीले शुध्द तुपाचे दिपाळे

ओवाळील्या आरत्या अन

उधळली स्तुतीसुमने

चंदनाची आहुती देऊन

केली होमहवने

चढलो पावले दर्ग्याची

केले सजदे मजारीचे

परी न दिसला देव कुठे

 

दिसला फक्त स्वाहाकार

भ्रष्टाचार अन अपहार

पदोपदी पैशाचीच गुहार

दर्शनास ही बडव्यास

दयावा लागे पैशाचा उपहार

चढाव्यास देवास ही

लागे प्रसाद अन फुलमाळ

तासनतास उभे राहून

होई दर्शन कष्टाने फार

सांगा असा हा लालची देव

कोणास देईल काय ?