देव खातो तुपाशी

 

माणूस राहतो उपाशी, देव खातो तुपाशी

पारोसा राहून घाण वास येई माणसाच्या अंगाशी

पंचामृतात न्हाऊन चंदनाचा टिका देवाच्या डोक्याशी

चंदनाच्या पालखीत, मखमली वस्त्रात सैर निघे देवाची

जवाबदाऱ्या पूर्ण करता करता टाकेतोड होई मानवाच्या ढुंगणाची

आरत्या, सलाम, दुवा सकाळसंध्याकाळ चाले देवाची सरबराई

पोटाची भरण्या खळगी उभा जन्म मानवाचा शिव्या खाता खाता जाई

परवरदिगारच्या जयंत्या, सालाना उर्स साजरा करण्यास वाजे ढोलताशे

मनुष्याच्या वाढदिवसास मोठ्या मुश्किलीन दोनचार लोक दिसे

मंदिर, मस्जिद, गिरिजाघरासमोर दिसे रोषणाई अन साफसफाई

मनुष्य मात्र जिंदगीभर आपल्या किस्मत का मैलचधोई

देव, पीर, गॉड साठी दिल्ली सुलतानभरभरून दान देई

मनुष्याची मात्र Tax भरताभरता पळता थोडी भुईहोई

भगवंता तू नावाप्रमाणेच मोठा,

अन मनुष्य ?

तो असला कितीही सदाचारी, तरी करंटा अन खोटा