देव

देव !

शेंदूर माखलेला, दगडाचा, लहान, मोठा कसल्याही आकाराचा

नर होतो नतमस्तक तयाला

करतो मनोभावे पूजा, अर्चना तयाची

 

मानव !

हाडामासाचा, मन असलेला, भावना असलेला

उच नीच, गरीबश्रीमंत, लहानमोठा

भेद पाडूनी हिणवतो आपण तयाला

 

अवडंबर माजवूनी दगडासाठी

बांधतो देवालये, निवारे

शुद्धाशुध्दीच्या कलुषीत मनोवृत्तीपायी

माणुसकीला फासतो काळे

दगडासाठी फुटतो पाझर पहा हृदयाला

बेघर, वस्त्रहीन, भुकेल्या जीवाचा नाही कळवळा तयाला

भावनाशून्य, अचेतन दगडासाठी भरली धान्याची कोठारे

गरीब, दिन-दुबळे सोडून धडधाकट ताव मारिती तेथे रे

 

आम्ही मानवजात सारखीहे तत्व विसरली सारे

दगडाच्या देवासाठी अंगारे, धुपारे, गाती गोडवे तयाचे

आपल्यातीलच आपल्या मानवाला करिती पोरके, हे कसे रे