दोस्तो हो

दोस्तो हो पाया पडतो मी तुमच्या

आता विचारू नका मला पीतो का म्हणून दारू

ह्या दारूच्या पायी झाला सत्यानाश

मी माझा स्वतः करून घेतला घात

घरदार, जमीन जुमला गहाण ठेवला सावकारापाशी

तो फक्त हयाच दारूच्या एका घोटासाठी

जेव्हापासून भेटली मला दारूची साथ

सुखी संसाराची झाली वाताहात

हयाच दारूच्या नादापायी

सोन्यासारख्या लेकराईची केली नाही कदर

मी मात्र छान पित राहिलो दिवसभर

ह्या दारून माझ्या आयुष्यात आणली पुर्ति अवकळा

वळ गेली अन वळीची वाखळी गेली

झालो पुर्ता खिळखिळा

म्हणून म्हणतो पिऊ नका दारू

विष आहे हे हिला बाजूलाच सारू