धरती अन आकाश

वर्षानुवर्षे

धरती अन आकाश

पाहती एकमेकांकडे

ओढ मिलनाची

व्याकुळ सदा करी तयासी

काय करावे ?

ना ठाऊक त्या मानसी

ताप ताप तापला

रवी एके दिवशी

जणू ओढ दाटुनी आली

सुटला सोसो वारा

कडाडल्या विजा कडाकडा

क्षणात शीतल, मंजुळ

बरसल्या जलधारा

धरित्री चिंब चिंब न्हाली

झाले आकाश धरित्रीचे मिलन

अवतरला नभी इंद्रधनुष्य

पसरला मातीचा

धरतीवर मंद सुगंध

वृक्षलता बहरून

साजरा करिती आनंद