कोणी कस वागाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
परंतु मानवाने माणसासारख राहाव
यातच सगळ्यांच हित आहे
कोणी धर्मग्रंथांना आपल्या “सर आँखों पर” ठेवतो
व त्याचा मतितार्थ साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवितो
तर कुणी त्याच धर्मग्रंथांना उशासारख
आपल्या डोक्याशी ठेवून झोपी जातो
जे लोक समाजग्रंथांना समाजप्रबोधनाचे साधन समजतात
ते त्याच पारायण, कीर्तन, समालोचन करून
त्यातल्या प्रबोधनाच्या गोष्टी साऱ्या समाजापर्यंत पोहोचवून
समाजप्रबोधनाचे काम करतात
अन जे लोक “उशा” सारखा डोक्याशी धर्मग्रंथ घेऊन झोपतात
ते स्वतःच स्वतःच्या ढोंगीपणाने संपून जातात
जगातला कोणताही धर्मग्रंथ असो
तो सूर्यासम तेजस्वी असून तेजोमय आहे
त्यातल्या ज्ञानाच्या तेजाने, माणसातल्या “असंस्कृतपणाचा” नाश होऊन,
माणसाचे जीवन उजळून निघते
त्यामुळे सर्वधर्माचा मान राखा, कलुषितता विसरा, सगळ्यांमध्ये मिसळा
व धर्मनिरपेक्षतेची गोडी चाखा