धर्मांधता

 

पोथी, पुराणे वाचतो,

पूजा अर्चा करतो,

दर्शनासाठी साळसूदपणे रांगेत लागतो

पण का कुणी पसरविली अफवा

वा केली जाणूनबुझून विटंबणा

सोडून सगळे नैतिकतेचे पाठ

सोडून दया, क्षमा अन शांतीची वाट

होऊन दैत्यासमान सुसाट

जाळून घरे, करून अनाथ पोरे,

वाहतो रस्त्यावर रक्ताचे पाट

 

काय कामाचा असा धर्म जो धर्मांध करतो

विविध व्रतवैकल्ये, उपासतापास

अन बेढंग चालीरीतींच्या मंत्रात भारून

माणसातल्या माणुसकीस मारून टाकतो