धर्मालयाच पावित्र राखा


बाहेर फिरावे तर दिसते मोठे विचित्र चित्र

कुण्या एका वडाच्या झाडाखाली ऊन, पावसाचा मारा सोसत

कुठल्या तरी देवाची मूर्ती किंवा मजार असते अन त्याच्या आजूबाजूला

चहा, समोसे अन फुले, प्रसाद विकणाऱ्यांची गर्दी दिसते,

कुठे एका झुडुपाआड लपून प्रेमी युगुल विकृत चाळे करीत असते

तर त्या देवासमोर आपल्या गाड्या उभ्या करून

देवासमोर पाठ करून, कुणी बिडी, सिगारेट ओढत फोनवर बोलतांना दिसते

अन कोणी आपल्या गाडीच्या बॉनेटवर खाद्य पदार्थ ठेवून खात बसते


लोकांचे कपडे, गाड्या मोठ्या महागडया

नुकतेच Beauty Parlour मधून आल्यासारखे भासतात

अन मोबाईलवर बोलत टोपलीत आणलेले हारतुरे

मोठ्या गर्वाने देवावर वाहत तिथेच उदबत्तीचे रॅपर्स,

जळालेल्या आगपेटीच्या काड्या, नारळाच्या करवंट्या फेकतात

देवाभोवती निर्माल्य साचून त्यावर माशा भिनभिनतात

अन कुबट वासात देवाचा ही दम कोंडतात


प्रेमिकेच्या गळ्यात हात टाकून

प्रेमी करत असतो अश्लील चाळे देवाच्या डोळ्या देखत

जातांना हात जोडत, “होऊ दे पूर्ण मनोकामनाम्हणत

प्रेमिकेला पाठीमागे बिलगवून बसवत, देवाच्या अंगावर धूर सोडत,

सिनेस्टाईल निघतो प्रेमी आपली बाईक सुसाट पळवत