आम्ही किती देवताळलो आहे बघा
देवाचा एक अशृ जिथे पडला त्या ठिकाणी नदी झाली म्हणून
तिला पवित्र मानतो
अमक्या देवाचे हिमालयात वास्तव्य म्हणून
कैलासाला स्वर्ग जाणतो
देवी सतीचे जिथे जिथे अवयव पडले ती शक्तिपीठे समजून
पूजितो तिची योनी
स्वतःस दिगंबरपंथी समजून साधुसम निर्वस्त्र राहतो नंग
महादेवाच्या पिंडीस बेलपत्रे वाहून
आराधितो त्याचे लिंग
मक्का–मदिनेस, कंबरेस छटाकभर वस्त्र नेसून,
इबादत करून राहतो अल्लाच्या संग
कुणा देवाचे, गोपिकेची मटकी फोडून, त्या अंघोळीला गेल्या असतांना
त्यांचे कपडे चोरून करत असलेल्या मस्तीला,
रासलीलेच्या नावावर आपल्याला चालते Eve teasing सारखे लफंग
धर्मग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आपण पाळतो तंतोतंत
अन T.V. वर तोकड्या कपड्यातील मुली, कंडोमच्या जाहिराती,
“इंटिमेट सिन” दिसतात म्हणून ते चॅनल करतो “चाईल्ड लॉक“
का तर ? न पहावे मुलांनी असल काही भलत–सलत
अजबच आपली बऱ्या–वाईटाची संकल्पना
एकीकडे मुलांसमोर योनी, लिंग पुजतो
नागव्या साधूंसमोर उभे करून त्यांचा मुलांना आशीर्वाद देतो
तेव्हा मुलांना भलत–सलत दिसत नाही का ?
त्यांच्यावर वाईट परिणाम होत नाही का ?
फक्त देवाच्या नावावर आपण ते पवित्र मानतो
व त्याची वाच्यता करीत नाही
देव, ऋषीमुनी असेच असतात म्हणून ते मनावर बिंबवून घेतो
मित्र हो, ती धर्मातील नग्नता असो वा T.V., चित्रातील
ते पाहून कोवळ्या मनावर जो परिणाम व्हायचा तो होणारच
अन तुम्ही ही हे चांगले जाणता
फक्त आपली मुले सज्जन, ती कधी वाममार्गाला लागणार नाही
हा गोड गैरसमज करून सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता