धुरात देवाचा आकार शोधतो आहे

 

आम्ही किती देवताळलो आहे बघा

आमच्या जवळ आहे ३३ कोटी देव

तरी ते आहेत आम्हाला कमी कि काय म्हणून

आम्ही दर्ग्यात थडग्यावर चादर चढवायला जातो,

रस्त्यात शेंदुराने रंगविलेला दगड दिसला तरी त्याला नमस्कार करून

अजून आपल्या देवात जास्तीच्या देवांची भरती करून घेतो

 

इतकेच नव्हे, कुणाच्या अंगात देव/देवी आली तर

त्याला/तिला ही देवाचा/देवीचा उपदेव/उपदेवी म्हणून

त्यांच्यासमोर दिवा लावून कापूर जाळतो

 

जनावरात देव पाहतो, गाईला कामधेनू म्हणतो

तर सिंहाला देवीचे वाहन जाणतो

 

लाकड ही आम्ही सोडले नाही बैलाच्या नांगरातबलराम दिसतो

तर बेलाच्या झाडातमहादेव प्रगटतो

 

एवढच नाही, कोणी पागल दिसला

तर त्याला अवलियासंबोधून महाराजांचा दर्जा देतो,

त्याच्यावर त्याच्या लीलासांगणारे पुस्तक काय लिहितो

अन दिवसरात्र मुर्खासारख त्या पुस्तकाच पारायण ही करतो

पण कुठल्या एका देवाला चिटकून राहण्याचे टाळतो

मला सांगा, काय अशाने देव भेटणार आहे ?

 

आपले रजिस्टर्ड ३३ कोटी देव

अन unregistered लाखो देव पुजून ही मानव दुःखीच आहे

समस्येचे निराकरण करण्याचे सोडून तो

उदबत्त्या अन धूप जाळून त्या धुरात ही देवाचा आकार शोधतो आहे

अंधश्रद्धेच्या गर्तेत गडप होऊन संपण्याकरिता खाई खोदतो आहे