"नंगे से खुदा डरे"

 

देवा तुझ्याबद्द्ल मला काहीही तक्रार नाही

पण जे तुझ्या नावावर २४ तास पूजापाठ करिती,

कोंबड्याबकऱ्यांचा बळी देती,

उपास करून पाठपोट एक करून घेती

अन आजारी पडून दवाखान्याच बिल भरती

अशा अज्ञानी मानवाबद्द्ल शिकायत आहे

 

 

नवस फेडण्यासाठी आपली मुलगी देवदासी म्हणून सोडून देती

स्वतःस पंडित म्हणविणारे त्यांचा उपभोग घेती

स्वतःच्या दिव्यांगमेंटल लेकरास तळहातावरच्या फोडासम जपती

अन गरीबाच्या सोन्यासारख्या पोरास कस्पटासम समजती

अशा स्वार्थी लोकांबद्द्ल शिकायत आहे

 

 

प्रत्येकजण भगवे अन हिरवे कपडे घालून बाबा अन फकीर बनती

एकमेकांच्या देवाला, त्यांच्या कर्मकांडाला नावे ठेवती

विविध पूजेच्या नावावर भोळ्या भक्तास लुटती

आश्रम, मदरशात अबलेस लुटती

अशा लंपटाबद्द्ल शिकायत आहे

 

देवा तु ही काय करशील

देऊन यांना सन्मती थकला असशील

हे ऐकतच नाही, तुझा ही नाईलाज आहे

म्हणतात ना, “नंगे से खुदा डरेही कहावत आहे