नंदादीप

जीवनाचा नंदादीप

व्यसनांना सारत

ठेऊ सुख समृद्धीने तेवत

मानव जन्म मिळतो

आयुष्यात फक्त एकदा

सार्थक करावे त्याचे

सोडून षड्रिपूंची विपदा

जीवनाच्या गुलाबाला

जपावे प्राणपणाने

व्यसनांचे काटे

न बोचू द्यावे तयाला