नका अंधविश्वासात राहू

 

देव पावला म्हणून लोक मंदिरमस्जिदीत जातात

तेथे देवाला अन्नदान, धनदान करतात

तिथला प्रसाद दहा लोकांना वाटतात

पण कळत नाही, खरच काहो लोकांना देव पावत असेल का?

मी तर प्रत्येक मंदिर, दर्ग्यात माथा टेकतो

देवाची, पिराची करुणा भाकतो

तरी ही देव माझ्याकडे दुर्लक्षच करतो

 

जेव्हा जेव्हा ही माझ अमुक काम निर्वीघ्नपणे पार पडू दे म्हणून

देवाची, पिराची करुणा भाकली

नेमक त्याच कामात अपयशान टांग अडकवली

 

शाळेत परीक्षेच्या वेळेस देवाला पास होऊ दे म्हणून विनंती केली,

हात जोडले, फुल वाहिली

पण एकाच विषयात दहा दहा वेळा नापास होण्याची वेळ आली

शेवटी जमून अभ्यास केला अन पास होण्याची खुशी झाली

ना देव ना कुठला पीर माझ्या मदतीला आला

माझे पराकोटीचे प्रयत्न अन विश्वासच मला प्रत्येक कामात यश देत गेला

 

असो, प्रत्येकाचे आपापले विचार आहेत

पण दैवावर इतका ही विश्वास नका ठेवू,

सर्वकाही देवच करते अशा अंधविश्वासात राहू

देव असू दया मनात, कर्म करा कसोशीने अन विश्वास ठेवा प्रयत्नात