नका करू घाण नदीतीरावर/धर्मस्थळावर

 

काय लाखोंच्या संख्येने जमून नदीच्या तीरावर महाआरती करता

वा मस्जिद, चर्चच्या पारावर जमून प्रेअर वा कलमा पढता

इतकी फुर्तायी दाखवा ते नदीच पात्र स्वच्छ करण्याला,

मस्जिद, चर्चच्या आवारात जमलेली घाण साफ करतांना

वा तिथे जमत असलेल्या भाविकांना

कशा सोई उपलब्ध करून देता येईल ते पाहतांना

काबा, काशी वा जेरुसलेमला काय जाता गलका करून,

साक्षात परमेश्वराचे ठिकाण, देवभूमी ती जाणून

केवळ आठवूनच त्या जागेची महती मन येते मोहरून

तेथे जाता मनी समजतो मिळेल आता स्वर्ग, जन्नत, हेवन मध्ये जागा

झाल आपल्या आयुष्याच सार्थक म्हणून

 

 

याव तिथेच मरण म्हणून कामना करता अन मरताच

अर्थीच्या लांबच लांब रांगा लावून मृतदेह त्याच नदीच्या पात्रात जाळता

स्वतःस साधू, पीर, सेंट समजून, अंगास भस्म चोळून,

कंबरेस काहीतरी थोड गुंडाळून त्या नदीतीरी/धर्मस्थळाच्या पारी अर्धनग्न फिरता

अर्धवट जळालेली प्रेते नदीत फेकता अन ती विद्रुप प्रेते पाहून

आपल्याला त्याच कायम्हणून डोळे बंद करता

नदीच्या पात्रात दिसते घाणच घाण साचलेली, सर्वत्र दुर्गंधी येत असलेली

काही मौल्यवान मिळते का म्हणून मुले चिखल चिवडत बसलेली

हारफूले, निर्माल्य टाकून, करून त्यात आंघोळ

धुवून आपल्या अंगावरचा मळ, करतो नदी घाण

त्यात आंघोळ केल्याने होते पापमुक्ती म्हणून

मारून देतो एक डुबकी नाक बंद करून छान

 

उष्ट अन्न प्लॅस्टिकच्या बॅगेत टाकून

नदीच्या तीरावर/धर्मस्थळाच्या पारावर फेकून देतो

आजूबाजूच्या आवारात तोंडातला खर्रा थुंकून

त्या पवित्र पाण्यात हात धुवून गुरळा करून घेतो

फक्त देखाव्यासाठी भक्तीचा आव आणून सकाळ संध्याकाळ

पवित्र तीरावर/पारावर पूजा, इबादत, प्रेअर करतो

भाविक जास्त जमून मिळून दान भरगच्च

कसा आपला धंदा वाढेल हेच तिथला व्यापारी/धर्ममार्तंड पाहतो

त्या नदीच्या/वास्तूच्या पावित्र्याशी आपल्याला काही घेणदेण नसते

कोणी त्यात आंघोळ करो, थुंको, कचरा फेको, त्यावर अतिक्रमण करो

करून त्याकडे कानाडोळा जो तो मूग गिळून बसते

बिसलेरी पाणी पिणारे हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन

आपल्या शरीराचा तोल सांभाळत तीरावर/पारावर येऊन उभे राहतात

अन तोंड विचकावून, डोळे बंद करून,

त्या घाण पाण्यासमोर/अस्वच्छता असलेल्या धर्मस्थळासमोर माथा टेकतात

कस बस एकदाच दर्शन झालम्हणून धन्यता मानतात

प्रशासन ही उगीचच कुणाच्या धर्मात खलल नको म्हणून दुर्लक्ष करतो

अन ज्याला जस वागायच असेल तस त्याला वागू दयाम्हणतो

 

मित्र हो, अरे सगळीच जवाबदारी केवळ सरकारची नाही

आपल्याला ही काही समजायला पाहिजे

ही धर्मस्थळे/नदीचे पात्र राहतील कसे स्वच्छ हयासाठी प्रयत्न करायला पाहिजे

ज्या परीस आपण जमतो नदीतीरी/धर्मस्थळाच्या पारी पुजण्या त्यांना

त्यापरीसच जमा तेथे नदी स्वच्छ करण्या, तो परिसर झाडण्या

नदया शुध्दी/धर्मस्थळ शुध्दीच्या नावे उगीचच सरकारला पैसे मागण्यापेक्षा

ठेवा आपल्या इष्टदेवतेची ठिकाणे स्वच्छ, स्वपैशाने

स्वतः वर्गणी करून, आपले परम कर्तव्य समजून

कोणी दिसता करतांना घाण तिथे, टोका त्याला,

करा मनाई त्याच्या असे अभद्र वागण्याला

 

नदीच्या तीरावर/धर्मस्थळाच्या पारावर मोठमोठ्या आरत्या

अन धर्मग्रंथाच पठण केल्यानच काही देव नसतो भेटत

धर्मस्थळांच, नदीओढ्यांच जपाव लागत पावित्र्य,

अरे इतक्या घाणेत जर माणूसच नाही राहू शकत

तर कल्पना करा, तिथे देव तरी असेल का वसत

नदी जर जीवनदायिनी आहे, तिच्या पात्रात आंघोळ केल्याने

जर होत असेल पापमुक्त्ती, येत असेल जीवनाला तृप्ती

तर तिचे ही पावित्र्य राखा, नका फेकू त्यात निर्माल्य अन कचरा,

त्यात आंघोळ करणे ही विसरा

 

त्यासाठी सगळ्यांवर एक कृपा करा

नदीच्या बाजूला एक छोटीसी जागा करून

त्या ठिकाणी वाहा हारफूले अन उदबत्त्या,

आपल्या अंगावरचे घाण पाणी नाही जाणार नदीत

यासाठी करून काही तजवीज

करून काठावर दूर एकेठिकाणी व्यवस्था मलविसर्जनाची

घ्या काळजी भक्तांच्या आंघोळीची/शुचिर्भूतपणाची

नदी तीर वा कुठल्या धर्मस्थळाचे पार प्रत्येकाला आदर त्याविषयी

आयुष्यात एक तरी वेळी तिथे जाऊन मानव उपकृत होई

नदया हया जीवनदायी, जर त्यांच्या दर्शने होत असेल कल्याण जीवनाचे

ठेवा आरश्यासारख्या स्वच्छ त्या, पहा त्यात प्रतिबिंब सुखसमृद्धीचे

पहा जगाकडे, आहेत किती स्वच्छ प्रगत देशाच्या नदया, धर्मस्थळे

घेऊ त्यातून काहीतरी बोध, खुलवू चिखलात कमळे