नका घेऊ भोंदू वैदूंची जडीबुटी

 

सहज रस्त्याने जातांना एका पांढऱ्या व्हॅन वर नजर पडली

त्यावर एक मोठे बॅनर होते नलदमयंती प्रेमक्रीडा करत असलेले

अन हिंदीत सभी गुप्त रोगो की दवा मिलने की विश्वप्रसिद्ध जगाम्हणून लिहिलेले

त्या व्हॅनच्या समोर एक मोठा कापडी तंबू होता

त्या तंबूत वेगवेगळ्या जटीबुटी अन अर्धमेली,

त्यांच्या शरीरातून तैलीय पदार्थ निघत असलेली सरड्यासारखी,

जीवनाची अखेरची घटका मोजत असलेली काही जीव होती

व त्या व्हॅन मध्ये बसलेली माणसे रस्त्यावरून येणाऱ्याजाणाऱ्यांना

त्यांच्याकडे पाहून तुम्हाला हा रोग आहेअसे घाबरवून, स्वतःकडे बोलवत होती

 

 

तर कोणत्या बसच्या काचेच्या खिडक्यांवर

छोटी छोटी pamphlet चिकटवून त्यावर समस्या लिहिल्या होत्या

कराया धराया, सौतन से छुट्टी, मिया बीवी मे अनबन वगैरे वगैरे….,

अन दावा केला होता

तीन दिन मे इन समस्याओ से WhatsApp पर निजाद पाईये,

अगर फायदा न हुआ तो पैसे वापस

असे लिहून त्या pamphlet च्या एका कोपऱ्यात

वेगवेगळ्या धर्माची धर्मचिन्हे छापली होती

अन त्याखाली मोठ्या अक्षरात WhatsApp नंबर सहित

त्या बाबाचे नाव लिहिले होते मियाँ फतेह खान

 

 

बर या भोंदू वैदू/जादू करणाऱ्यांजवळ जाणाऱ्यांची ही गर्दी दिसे

कोणी ते pamphlet पाहून त्या भोंदूला WhatsApp message ही करे

वाईट वाटते हे पाहून, अरे खरच हे भोंदू वैदू/जादू करणारे जाणकार असते

तर कशाला रस्त्याच्या कडेला जुन्या पुरान्या गाड्यात बसून

ग्राहकांना स्वतःजवळ बोलावून जडीबुटी घ्याम्हणून ओरडले असते

किंवा या भोंदू जादू करणाऱ्यांजवळ गुण असता तर कशाला यांना

pamphlet जागोजागी लावून जाहिरात करावी लागली असती

 

मित्र हो, नका यांच्या नादी लागू, नका बिनढोकासारखे वागू

ज्याच्याजवळ गुण असतो तो कस्तुरीसम असतो

जाहिरात न करता ही जगतविख्यात होतो

जगात एकापेक्षा एक तज्ञ डॉक्टर पडलेले आहेत

त्यांच्या जवळ जा व खात्रीने ईलाज करा

 

नका अशा भोंदू जादू करणाऱ्यांकडे जाऊन

अजून मनात नवीन भलतसलत भरवून

या भोंदू वैदूंची जडीबुटी घेऊन, आयुष्याची नासाडी करून,

शरीरावर विपरीत परिणाम करून घेऊन

नका हो जाऊ अकाली मरून

 

अहो अशा भोंदू वैदूंची प्राणघातक जडीबुटी घेण

किंवा भोंदू जादूटोण्यावाल्याकडे जाऊन आपल डोक खराब करण म्हणजे

ही एक प्रकारची आयुष्यात होणारी बौद्धिक भेसळच आहे

जी अकलेची दिवाळखोरी काढून माणसाला कफल्लक करते

धान्यातील भेसळेवर कायदयाने अंकुश ठेवता येतो

पण अकलेच्या भेसळेवर स्वतःच नियंत्रण ठेवावे लागते

अन्यथा कोणी तुमच्या मनावर ताबा मिळवून,

राहणार नाही तुम्हाला मानसिक रुग्ण बनविल्या वाचून

 

मित्र हो, विनंती आहे माझी तुम्हाला, नका हो असे वागू

मनावर ठेवा ताबा, वाचवा स्वतःला यांच्यापासून

सांभाळा स्वतःला, दिलोदिमागाने सुशिक्षित बना

अशा या भोंदूंपासून सावध रहा