नका जाती-धर्मासाठी भांडू

 

काय देवधर्माच्या, जातीपंथाच्या नावाने भांडता

धर्मातील उणीवा काढून एकमेकांना हिणवता

मोहल्यातून शोभायात्रा, उर्स नेला तर दंगे घडवून

निरपराध नागरिकांची घरे जाळता, त्यांना उघड्यावर आणता

अरे जगातले सर्व धर्म अन त्यांचे देव हे सर्वोत्तम आहेत

त्या देवांचा धर्म अन शिकवण जरी वेगळी असली

तरी ते त्यांच्या स्वर्ग, हेवन अन जन्नत मध्ये गुण्यागोविंदाने राहतात

अन तेथून पृथ्वीवरील लोकांवर कृपाळू दृष्टीने पाहतात

 

अरे काय धर्माचे भांडण घेऊन बसता ?

त्या परीस आपल्या धर्मातल्या चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी

स्वतः जीवनात अनुसरून साऱ्या जगासाठी एक आदर्श निर्माण करा,

आपला धर्म कसा वाईट गोष्टी दूर सारा म्हणून सांगतो,

आधुनिकतेचा मार्ग स्वीकारा म्हणून सांगण्यास धजतो

हे स्वतः तुम्ही शिकून सवरून, डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ बनून

एक नवा आधुनिक समाज निर्माण करून दाखवा

 

अरे कुणाचे धर्मपरिवर्तन करण्यापेक्षा

आपल्या धर्मातल्या वाईट गोष्टी, चालीरीती दूर करण्यासाठी भांडा

व त्या दूर सारून साऱ्या दुनियेसाठी आमचा धर्म किती प्रगत,

कसा दुसऱ्याविषयी आपुलकी दर्शवितो, आधुनिकतेची कास धरा म्हणून शिकवितो

व कसा धर्मनिरपेक्ष समाज घडविण्यास सुचवितोहे दर्शवा

 

अरे काय देव, जाती, धर्मासाठी भांडता

त्यापेक्षा आपल्या धर्मातील अमंगळ गोष्टी दूर करण्यासाठी झटा

व आपुलकीने प्रत्येकाकडे पाहून मानव म्हणून एकमेकांच्या गळे भेटा