नका शोधू जात

 

माझ आडनाव देशमुखऐकून सर्वजण मला विचारतात

काहो तुम्ही O.B.C. आहात काय ?

ते ऐकून मी विचारात पडतो अन निःशब्द होतो

अन मनात म्हणतो नाही मी O.B.C, नाही Open अन नाही अल्पसंख्यक

 

जग कुठे चालल आपण कुठे चाललो

अजून ही आपण जातीसमाजाच्या जात्यातच भरडून राहिलो

आपण त्या व्यक्तीच्या गुणांकडे, त्याच्या ज्ञानाकडे नाही पाहत

तर त्याचा पेहेराव, त्याची बोलीभाषा अन आडनाव ऐकून

समोरच्याची तोलतो अवकात

 

आम्हाला कुणाच्या गुणाशी, कुणाच्या ज्ञानाशी काही घेणदेण नाही

कोणी मोठ्या पदावर किंवा निष्णात डॉक्टर, इंजिनिअर असेल तर

त्याला जातीचा सपोर्ट मिळाला म्हणून पुढे गेलायेतो या निर्णयावर

असल्या या वागण्याने प्रत्येक समाजात वाढली तेढ

प्रत्येकजण एकमेकांकडे पाहून हा आपला हक्क तर हिरावणार नाही ना

या भावनेने घेतो एकमेकांचा सूड,

जात पाहूनच करतो मदत कुणाला,

आपल्या जातीचा नसेल तर जातीवाचक शिव्या देऊन हाकलतो त्याला

 

मित्र हो, नका येऊ हो नेत्यांच्या झाश्यात

माणसाशी माणसासारख वागा, प्रत्येकाच्या परिस्थितीचा विचार करा

असच जात शोधत राहिलो तर एक दिवस आपणच येऊ गोत्यात