नका सांगू स्वतःची जात श्रेष्ठ म्हणून


काय स्वतःची जात श्रेष्ठ म्हणून गर्वाने सांगता

हा माझ्या समाजाचा कद्दावर नेता म्हणून

आपल्या जातीच्या माणसाची ओळख करून देता

काय कुण्या जमीनदाराकडे पाहून

आम्ही कुळ कसणारी जमात आहोतम्हणून अभिमान बाळगता



अरे मूर्ख हो, कोणता बामन पुजारी गरीब बामनाकडे

बिना दक्षिणा घेतल्याशिवाय पूजेला जातो काय ?

किंवा कुठला मुसलमान आपल्या समाजाच्या माणसाकडे

पैसे नाही म्हणून त्याच्या अडीअडचणीला धावून येतो काय

कि फुकटात त्याच अडलसडल काम करून देतो काय ?

किंवा कोणता श्रीमंत ख्रिश्चन आपल्या समाजाच्या गरीब बांधवाला

आपल्या मुलाच्या Baptisma ला आपल्या घरी बोलावितो काय ?

अरे आपलाच माणूस आपल्या समाजाच्या माणसाशी व्यवहारी वागतो

पैसा भेटत असेल तर बोलतो, नाही तर दुसऱ्याकडून काम करून घेम्हणत

दुसऱ्या समाजाच्या/जातीच्या माणसाकडे बोट दाखवीत

त्याच्याकडून आपल काम करून घेम्हणत तेथून पळता पाय काढतो



मोठे सांगता हा आमच्या समाजाचा कर्तबगार नेता किंवा जमीनदार

तर का मग तुमच्या समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी तो पुढे येत नाही ?

का तुम्हाला तसाच दारिद्रयात खितपत ठेवतो ?

का तुमच्यातल्या गरिबातल्या गरिबांना आर्थिक मदत करून,

त्यासाठी स्वतःचे धन खर्च करून, त्यांची आसवे पुसून,

आपला समाज पुढे नेत नाही ?



मित्र हो, नका आपल्या जातीची, समाजाची फुशारकी मारू

ना आपल्या समाजाच्या लोकांचा मोठेपणा सांगू

कोणीच कोणाच्या कामा येत नाही,

जेव्हा माणसावर बितते तेव्हा कळते

जर आपल्या समाजातल्या लोकांनी

आपल्या समाजातल्या लोकांना आपले समजले असते तर

प्रत्येक समाजात विषमता नसती, सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत असते



मित्र हो, सोडा आपल्या समाजाला श्रेष्ठ समजण्याचा अहंपणा

समाजाचा माणूस आपला नाही, जातीबाहेरचाच माणूस साथ देतो

सगळ्यांच्या कामी या, सगळ्यांना आपले माना,

परका माणूसच आपल्या सुखदुःखात धावून येतोहे जाणा