नकोत मला पदव्या

 

सर“, “लॉर्ड“, “पद्मश्रीवा पद्मभूषण

हया नकोत पदव्या मला

लोकनायक“, “लोकमान्यवा देशबंधू

नकोत हया चिकटपट्ट्या नावाला

राहू दया मला असा साधाच

लोककल्याणार्थ झिजण्याकरिता

करू दया मला तळमळीने, हिरीरीने

राष्ट्र उत्थानाचे कार्य

उगाच पदव्यांच्या बेड्या पायी ठोकून

मोठमोठ्या नामाभिदानाच्या चिकटपट्टयांनी गळचेपी करून

नका हो घेऊ

माणसापासून माणसाला हिरावून

 

 

नको मला नोबेलवा पुलित्झर

माझ कार्य आहे अफाट, थोर

नसे संकुचित मावणार त्या छोट्या मेडलच्या वाटीवर

अन मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर

ही तर चैतन्य ज्योत

विस्फारून आपली प्रभा विखरेल जगभर

 

नको मला हया पदव्या

ज्या मनी आणिती गर्व,

मुकविती कर्तव्यास

त्या परीस मी असाच अनोळखी बरा

करतांना जगदोध्दाराचे कार्य

न आडवा येई कोणताही मखमली पट्टा गळा