लहानपणी तोंडून आजीच्या
ऐकला
मर्यादा पुरुषोत्तम, कनवाळू राम
आज मात्र तो
बदललाय जाम !
कलियुगात घेऊन
आधुनिक अवतार
सत्तालंपटांशी मैत्रीची बहार,
व्याख्याने, सभा–मंडपे,
सत्तालंपटांचा बनून ट्रेड
सव्यंग प्रसिद्धीचा
जुळवूनि घेशी मेळ
येता इलेक्शन येई तुला मजा
राम नामावर
तुडवीशी भोळिभाळी प्रजा
रथयात्रा काढून
करिशी भारत भ्रमण
मात्र नंतर
करोडो रामभक्तांच्या भावनेचे गमन
इलेक्शनच्या रणधुमाळीत
पडता निरापराध्यांचे मुडदे
होई तुज आनंद
येता हातात सत्तेचा खजिना
म्हणीशी
अजेंड्यावर आहेत
अजुनी आमचे भाऊबंद
लहानपणी एकला तो राम
आता सर्वथः बदलला
सत्ताधीशांच्या बॅनरवर तो आता रुळला !