नको धर्मालये

 

आम्हास नको आता

मंदिरे, मस्जिदे अन गिरिजाघरे

वा नको ईश स्तुतीची प्रवचने

हवीत आम्हास आता

तंत्र शिकविणारी शास्त्रे

शाळा, व्यापारउदीम अन कारखाने

अन हवीत प्रगतीची व्याख्याने

 

नको तो देव अन त्याची पुराणे

वा रामरहीम यांची गाऱ्हाणे

हवीत आम्हास आता

सूर्य चंद्रावर जावून

अंतराळ धुंडाळणारी पावले

 

नकोत ती चबुतरे अन पुतळे

वा अन्य कुणाची शिल्पे

हवीत आम्हास आता

अत्याधुनिक संगणके, यंत्रमानवे

अन शेती फुलविणारे अवजारे

 

नको ती जातीची भांडणे

वा भाषा, प्रांतासाठी रक्त सांडणे

हवीत आम्हास आता

आकाश्यास गवसणी घालणाऱ्या

विज्ञानाची कवचकुंडले

 

नकोत ती भाषणे

आश्वासने अन आरक्षणे

हवे आम्हास आता

लावून हात भारत निर्माणास

गुण्यागोविंदाने ते नांदणे