कधीही मंदिर–मस्जिदीत न जाणारा त्या दिवशी हटकून तिथे जातो
अन देवाचा, अल्लाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतो
काहो फक्त नववर्षाच्या पहिल्या दिवशीच काय देव
आकाशातून मंदिर–मस्जिदीत येतो का ?
जर असे असेल तर मग बाकीचे दिवस काय
त्यांचे चेले–चपाटे, खादिम, पाद्री, पुजारी यांचे असतात काय ?
जर अस आहे तर मानव मूर्ख आहे कारण
नववर्षाचा दिवस सोडून इतर दिवशी
धर्मालयात देव नसतांना ही तो तिथे जातो अन वारेमाप खर्च करतो
मित्रहो खरे सांगायचे तर ना आपल्याला देव समजला ना नववर्ष समजले
प्रत्येकाचे नववर्ष वेगळे आहे
कुणाचा गुढीपाडवा, कुणाचा पोंगल, कुणाचा बिहू
तर कुणाचे लक्ष्मीपूजन
पण आपल्याला याचा पडला विसर
या पवित्र दिवशी गोडधोड करून कुटुंबासमवेत आनंद साजरा करण्यापेक्षा
फुकटात दारू अन मच्छी खायला मिळते म्हणून
इंग्रजी वर्ष निघतो मनवायला
आपल्याला पावित्र्याशी काहीही घेण–देण नाही
भोगवादी संस्कृतीचा आदर्श बाळगून
फुकटाची बाई, बाटली अन बकरी पाहिजे उपभोगायला
अरे जर केवळ इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवसालाच
जर देव–अल्ला असे मंदिर–मस्जिदीत असते
तर बाकी दिवस कशाला जाता तिथे माथा टेकवायला
कशी रे मानवजात, थोड डोक ठिकाणावर ठेवा
उगीचच चेंगराचेंगरी करून म्हणू नका हाय हाय रे देवा !