नशिबाचा मार

 

किती दुःख आहे देहास

पडे प्रश्न मानवास

परी तो भुलला

ज्या विधात्याने केले निर्माण हे जग

त्यास ही न सुटले हे भोग

 

इंद्रास ही दानवांपासून वाचविण्या देवलोक

करावा लागला शंकराचा जप

ऋषीमुनींना ही प्राप्तीसाठी देव

जाऊन घोर अरण्यात करावे लागले तप

 

कर्ण ही औदार्यात कवचकुंडले गमावून

तडपत राहिला रक्तबंबाळ होऊन

 

अश्वत्थामा ही शिरी घाव मिरवून

शापमुक्तीच्या आशेने भ्रमणकरी युगे न युगे

अमरत्वाच्या वेदनेने

 

प्रखर सूर्य, चंद्र ही

झाकोळून जाती

ग्रस्तादीत होऊनी

 

ब्रम्हांडात ही कुठल्या ना कुठल्या ग्रहांवर

होऊन प्रचंड स्फोट

विभागून त्यांचे ही होती शकले चार

 

कर्माची गती न्यारी

त्यातून न सुटले कोणी लहान थोर

आपापल्या कर्माप्रमाणे

प्रत्येकास खावा लागे नशिबाचा मार