नामवंतांची सफाईगिरी

 

नामवंतांच ही साल मोठ चांगल आहे

ते रस्ते झाडतात तर

छायाचित्रकारांच्या कॅमेराच्या प्रकाश झोतात

जेवढा त्यांनी रस्ता झाडून चमकवला नसेल

त्याच्यापेक्षा जास्त उजळून निघतात

सामान्य माणूस रस्ता झाडतो

तर लोक त्याच्यावर दात काढून हसतात

अन हे श्रीमंत नामवंत लोक जेव्हा रस्ते झाडतात

तेव्हा हेच सामान्य जन उत्कंठतेने नख चावतात

 

 

अरे हे श्रीमंत नामवंत जेव्हा हातात झाडू घेतात

तेव्हा त्यांच्या हातातला झाडू घेण्याकरिता

इतर लोकांचे दहा हात त्यांच्या मागे धावतात

हे दोन मिनिटेच रस्ता झाडतील

पण अवघी पृथ्वी झाडून स्वच्छ केली

एवढी त्यांची ख्याती होते

समाजसेवा केली म्हणून

सरकार दोनचार पुरस्कार ही देते

 

सामान्य माणूस काहीही झाडो

सरकार दरबारी त्याची काही नोंद नाही

हा बिचारा बारमाही पाठीवर ओझच वाहत राही