नाराजी निसर्गाची

 

निसर्गाच्या नाराजीन

कास्तकाराला आल रोजच मरण

कधी अवर्षण, तर कधी ढगफुटी

तर कधी अवकाळी पाऊस

तर कधी किड्यांचा प्रदुर्भाव

अशा या दृष्टचक्रात अडकला हा महानुभाव

 

सततच्या या नापिकीने

चढे सतत डोंगर कर्जाचा

गहाण ठेवता ठेवता

पोटापाण्याची सोय असलेली

व्याजात चालली जाते जमीन

 

एकुलती एक व्याजात गेल्यावर जमीन

होऊन हवालदिल

उचले आत्महत्येच पाऊल

आधीच आयुष्याची बरबादी

त्यात त्याच्या आत्महत्येन

होई साऱ्या कुटुंबाची उध्वस्त जिंदगानी

 

बायको शॉक लागल्यागत वेडी होये

तर आसव ढाळी माऊली

बघून लेकाची, फोटोस्वरूप सावली

 

कधी अंत होईल या दृष्टचक्राचा

विधाताच जाणे

परंतु हे भगवंता

हजारोच्या अन्नदाताला

नको देऊ हे असे जिणे