निवद

 

देव नाही पावत, दिल्या शिवाय निवद

हे जाणून समध, व्हा आता तरी सावध

 

दगडधोंड्याचा देव, ना रूप ना काया

शेंदूर फासा लागते, त्याले ही रंगाया

 

होमहवन अन पोथीपुराण, घालून न्हावू पंचामृतान

तरी बी देव, देत नाही सुतान

 

कायचा तो देव, ना त्याले कान ना वाचा

अश्या मुक्या बहिऱ्या समोर, फोडन आहे नुसता माथा

 

सोडा समध सार, व्हा सुशिक्षित

विज्ञानाची कास धरून, व्हा प्रशिक्षित