पाहून काळभोर आकाश
डोळ भरून आल
नापिकी, कर्ज, गरिबीचं तन
त्यात वाहून गेल
निसर्गराजा आडमाप बरसला
अन कास्तकारराजा मनीच हरकला
कधी नव्हे तो घास आज अंगी लागला
आकाशातली वीज अंगात भिनल्यागत
मोठ्या ऊर्जेने तो कामाला लागला
हाडाच्या सापळ्यात आली लोखंडाची ताकत
कंबरेच फाटक पोतेरही करून विचार
पिकल्यावर धनी नवीन घेईल धोतर
चिंब होऊन उत्साहान आल लाज झाकत
घरची पोर–टोर होऊन म्होर
उचले अंगणात पडलेली गार
भिजून चिंब पाण्यात
उधळती अंगावर मनसोक्त तुषार
निंदण, वखरन, डवरन, पेरणी, फवारणी
करून सोपस्कार सारी
शेतकरीदादा करी विचार मनी, देऊन जुनी देणी
पिकताच शेत, येईल सुख संपत्ती घरी