नेत्यांची धर्मनिरपेक्षता

 

अंधश्रद्धेवर नाही विश्वास

नुसतच तोंडान घोपाटल

धर्मनिरपेक्षतेच्या युगात

देवान थोरामोठ्यांना झपाटल

 

इन्फोटेक सिटीचे मंत्री

घालतात साईबाबांना पायघड्या

अन आधुनिक महाराष्ट्राचे

महत्वाच्या बैठकी सोडून

सत्य साईबाबाला घालतात प्रदक्षिणा

 

म्हणतात आहोत आम्ही धर्मनिरपेक्ष

अन मक्कामदिनेच्या यात्रांना

देतात सवलती भरगच्च

गणपतीच्या सुटीसाठी कल्लोळ माजवून

पूर्ण सभागृह करतात खच्च

 

कोणत्याही धर्माचा येवोत मोठा सण

हे मंत्री दिसतात तिथे पहिले

भगव, हिरव, नीळ पक्क सांभाळून

शिवतात त्याच धर्मनिरपेक्षतेचे थैले

 

मानव जात एक

न त्याचा देव ना धर्म कोणता

पाहिजे नुसत्या गप्पा मारायला

मंत्र्यापासून तर राष्ट्रपतीपर्यंत

जातात सर्वच अभिषेकाला काशीच्या महादेवाला

ज्याला माहात्म्यही कळत नाही

असे कुंभमेळ्यात मारतात डुबक्या

आषाढीला पंढरीच्या पांडुरंगाची

करतात शासकीय पूजाअर्चा

 

पक्के सारे नेते सत्तालंपट

नुसती नावाची धर्मनिरपेक्षता

अंगी अंधश्रद्धा बाळगून

घालून जामा आधुनिकतेचा

वाहतात कोणत्या ना कोणत्या देवाला अक्षता