पंगू देव

 

स्तोत्र केली सारी पाठ, धुंडाळली सारी घाट

होमहवने करून, सोवळ्यासंगे जेवू घातले पंचपक्वान्नाचे ताट

भगवंत प्राप्तीस फिरलो दऱ्याकपारे अन कंटिकाकर्ण वाट

मारल्या प्रदक्षिणा दोन्ही हात जोडून सतराशे साठ

कदाचित पाहत असेल प्रचिती म्हणून देत असेल त्रास

समजावून मनी लागलो भगवंत शोधण्यास

थकून भागून होऊन चिंब घामात

पडला विचार मनी, ही भगवंत नावाची जमात असेल का अस्तित्वात ?

ऐकले महादेव मोठा कनवाळू देतो दर्शन पटकन

गणपतीस देता मोदक तोही होतो आपला साधक

केल्यावर सत्यनारायणाची पूजा भगवान विष्णू ही देती दर्शन कृपाशंख निनादत

मोठ्या आशेने आहुत्या दिल्या तुपाच्या अन कांड्या जाळल्या सुगंधाच्या,

देवास न्हाऊ घातले दुधाने माखून चंदन, गंध, हळद अन फुलाने

सोबत प्रसाद वाहिला शुध्द तुपाचा त्यात घालून बदाम, खारका अन लावून वर्ख चांदीचा

मुखशुध्दी म्हणून समोर ठेवला तोबरा तांबुलाचा

सारे गेले व्यर्थ परी न दिसला भगवंत

 

वेळ गेला, पैसा गेला अन निघाल्यावर दिवाळ अकलेच कळल

अरे जो अस्तित्वात नाही, ज्यास स्वतः आपल्यास आंघोळ घालून दयावी लागते,

ज्यास आपल्यालाच अन्न दयावे लागते तो कसला देव

अरे जो स्वतःच पंगू आहे तो काय देऊन आपल्यास मदतीचा आधार

पारिपत्य करेल आपल्या दुःख, दैन्याचा सारून दूर कर्माचा अंधार