पराकोटीची अंधश्रद्धा

 

आपण भारतीय चंद्र, मंगळावर गेलो

पण लोकांची पाहून अंधश्रद्धा पराकोटीची मन होते विषिन्न

आपण होमहवन करूनच दवाखान्याचे करतो भूमिपूजन,

मंत्रोच्चारातच करतो औषधांच्या दुकानाचे वास्तुपूजन

कोणत्याही धर्माचा गुणीजन, सोडून आपले शहाणपण

भक्तिभावे करे तिथे कलमा, प्रेअर अन भजनाचे आयोजन

 

 

पर्यटनाला जातांना न पाहू, वाहन आहे की नाही चांगल्या स्थितीत

वा आहे की नाही पैसे जवळी,

मायबाप लग्न जुळवितांना मुलामुलींची

न काढे माहिती नवऱ्या मुलाची की तो करतो काय

वा ना काढे माहिती नवऱ्या मुलीची की ती घरंदाज आहे की नाय

दाखवून कुंडल्या पंडित, मुल्ला, पाद्रीला म्हणे सांगा योग जुळून येतो काय

 

कर्ज काढून जाय परदेशी फिराया, आवाक्याबाहेर खर्च करून लग्नात उडवे माया

शनिवारी शनी महाराजाच्या डोक्यावर बाटल्या बाटल्या तेल ओतून

झुकू झुकू मुजरा करून म्हणे माझ कर्ज फिटू दे रे देवराया

घरच्या आईबाया पोराचे, नवऱ्याचे दिवस फिरले म्हणून

टळली पाहिजे मुसीबत त्यांच्यावरून, घरी पीर, फकीर, साधू, संत आणून

सकाळसंध्याकाळ हारफूले घेऊन वेगवेगळ्या धर्मस्थळी दिसती जाया

 

 

आपण बायाबापूडे असोत डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक वा सुशिक्षित कुठले

दिसे आपल्या मनगटावर राम, रहीम, प्रभू येशूचे नाव गोंदले